दिल्लीत Tis Hazari Court परिसरामध्ये वकिलांमध्ये बाचाबाचीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यामध्ये कुणी जखमी नाही अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकिलांमध्ये काही बाचाबाची झाली त्यानंतर ही घटना घडली आहे.  सध्या या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  बार कौन्सिल ऑफ दिल्लीचे अध्यक्ष KK Manan यांनी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा निषेध केला आहे.  ते म्हणतात, "या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल. शस्त्रांना परवाना दिला होता की नाही याची चौकशी केली जाईल. शस्त्रे परवाना असतानाही, कोणताही वकील किंवा इतर कोणीही न्यायालयाच्या आवारात किंवा परिसरात त्यांचा वापर करू शकत नाही."

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)