बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व तत्सम पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तसेच पोलीस व मिलीटरी भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता काही तांत्रिक अडचणीमुळे दि. 22 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच चाचणी परिक्षेचा दिनांक 26 डिसेंबर 2021 रविवार रोजी असा बदल करण्यात  आला आहे. देण्यात आलेल्या मुदतीपर्यंत विद्यार्थ्यांच्या अर्जाचा स्वीकार करण्यात यावा असे संबंधित प्रशिक्षण संस्थेस कळविण्यात आलेले असुन, जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी अर्ज करावे व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना यासंदर्भात काही अडचणी आल्यास बार्टी, पुणे या कार्यालयाच्या 020-26343600/ 26333330 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे बार्टीमार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)