सागरी मार्गाने अंमली पदार्थ भारतात आणण्याचा धंदा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याबाबत सरकार आणि तटरक्षक दल सतर्क आहे. नुकतेच अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्धच्या मोठ्या कारवाईत, एटीएस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि तटरक्षक दलाने अंदाजे 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. हे ड्रग्ज एका बोटीतून आणले जात होते ज्यात 6 लोक होते. मिळालेल्या माहितीनुसार ही बोट पाकिस्तानी असून त्यातील 6 जणांना अटक करण्यात आली आहे. 11-12 मार्चच्या रात्री भारतीय तटरक्षक दलाने गुप्त माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई केली. पोरबंदरपासून सुमारे 350 किमी अंतरावर अरबी समुद्रात भारतीय तटरक्षक जहाजे आणि डॉर्नियर विमानांनी केलेल्या समन्वित सागरी हवाई ऑपरेशनमध्ये ही बोट अडवण्यात आली. यासाठी भारतीय तटरक्षक दलाने सोमवार, 11 मार्च रोजी अरबी समुद्रात आपली जहाजे रणनीतिकदृष्ट्या तैनात केली होती. ICG ने आपल्या डॉर्नियर विमानाला संभाव्य भागात बोट स्कॅन आणि शोधण्यासाठी नियुक्त केले होते. त्यानंतर रात्री परिसरात कसून शोध घेण्यात आला आणि नंतर टीमने अंधारात संशयास्पदरित्या फिरत असलेली बोट ओळखली. (हेही वाचा: Tejas Fighter Jet Facts: फायटर जेटची वैशिष्ट्ये; 23 वर्षांमध्ये पहिल्यांदाच घडला अपघात; घ्या जाणून)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)