पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावरून ड्रोन कॅमेरा उडवल्याची घटना समोर आली आहे. नो फ्लाईंग झोन असतानाही या ठिकाणी ड्रोन कॅमेरा उडवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पहाटे साडेपाचच्या वाजण्याच्या सुमारास हा ड्रोन कॅमेरा उडवण्यात आला अशी माहिती आहे. सुरक्षा यंत्रणांकडून यासंदर्भात कसून शोध सुरू आहेत. हा ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीचा तापस सुरक्षा यंत्रणांकडून घेण्यात येत आहे. नवी दिल्ली परिसरातील सर्व अधिकारी आणि भरारी पथकांनी ड्रोनचा शोध सुरू केला आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)