Indian Army Drone Falls In Pakistan: भारतीय लष्कराचे एक मिनी यूएव्ही (मानवरहित हवाई वाहन) शुक्रवारी, 23 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या सीमेवर पोहोचले. सकाळी 9.25 च्या सुमारास प्रशिक्षण मोहिमेदरम्यान हा प्रकार घडला. ड्रोन चालवणाऱ्या भारतीय लष्कराचे त्यावरचे नियंत्रण सुटले. यानंतर हा युएव्ही पाकिस्तानच्या निकियाल सेक्टरमध्ये पोहोचला. हा परिसर भारतीय भिंबर गली सेक्टरच्या अगदी समोर आहे. यूएव्ही भारतीय सीमेच्या आत प्रशिक्षण मोहिमेवर होते, परंतु तांत्रिक समस्येमुळे ते नियंत्रणाबाहेर गेले आणि पाकिस्तानच्या दिशेने वळले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लष्कराने आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. (हेही वाचा; Penalty to Air India: गैर-पात्र क्रू सदस्यांसह विमान चालवल्याप्रकरणी एअर इंडियाला 90 लाखांचा दंड; DGCA ची कारवाई)

भारतीय लष्कराचे ड्रोन पाकिस्तानच्या निकियाल सेक्टरमध्ये पडले-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)