Driving Rule: नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी अल्पवयीन मुलांद्वारे वाहने चालवण्याविरोधात मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना आढळल्यास, त्याचे पालक आणि वाहन मालकावर गुन्हा दाखल केला जाईल. गौतम बुद्ध नगर पोलीस आयुक्तालयाने 18 वर्षांखालील व्यक्तींनी दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविण्याबाबत पालकांना सक्त ताकीद दिली आहे. पोलिसांनी इशारा दिला आहे की, नियमांचे उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंतचा दंड, अल्पवयीन चालकाच्या पालकांवर कायदेशीर कारवाई, 12 महिन्यांसाठी वाहन नोंदणी रद्द आणि अल्पवयीन व्यक्ती 25 वर्षांची होईपर्यंत परवाना न मिळणे अशी शिक्षा होऊ शकते. नोएडा पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात, अल्पवयीन मुलांनी कोणत्याही प्रकारचे वाहन चालवणे अयोग्य आणि बेकायदेशीर आहे यावर जोर दिला. ‘कोणत्याही पालकांनी त्यांच्या अल्पवयीन मुलांना कोणत्याही परिस्थितीत दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविण्यास परवानगी देऊ नये,’ असे निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा: UP Paper Leak Case: पेपर लीक प्रकरणी उत्तर प्रदेशच्या 2 आमदारांसह 18 जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)