Donald Trump Win Celebration in Prayagraj: अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना 277 इलेक्टोरल मते मिळाली, तर कमला हॅरिस यांना 224 इलेक्टोरल मते मिळाली. अमेरिकन निवडणुकीत भारतातूनही अनेक लोक डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देत होते. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर भारतासोबतचे संबंध मजबूत आणि विश्वासार्ह करण्याबाबतही चर्चा झाली. यामुळेच आज भारतातील जनताही अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा करत आहे. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनिमित्त प्रयागराज संगम येथे लोक एकमेकांना मिठाई खाऊ घालताना दिसते. यावेळी लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोसह आनंद साजरा केला आणि त्यांच्या फोटोलाही मिठाई खाऊ घातली. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक ट्रम्प यांच्या विजयाचा जयजयकार करताना दिसत आहेत. (हेही वाचा: US 2024 Election Cost: अमेरिकेची यंदाची अध्यक्षपदाची निवडणूक ठरली इतिहासातील 'सर्वात महागडी'; मोहिमांद्वारे खर्च झाले विक्रमी 15.9 अब्ज डॉलर्स)

Donald Trump Win Celebration in Prayagraj:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)