Digital Rangoli On Ayodhya Roads: अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी भव्य मंदिरात राम लल्ला विराजमान झाले. त्या दिवसानंतर राम लल्लाच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल होत आहेत. अयोध्या नगरी अजूनही एका नव्या नवरीसारखी दिसत आहे. आता अयोध्येतील रस्ते डिजिटल रांगोळीने सजले आहेत. हनुमानगढ़ी मंदिराच्या प्रवेश रस्त्यावर डिजिटल रांगोळी पाहायला मिळाली. सोशल मिडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अयोध्येतील रस्त्यांच्या वर काही खास लाईट्स बसवण्यात आले आहेत, ज्याद्वारे जमिनीवर डिजिटल स्वरूपातील रांगोळीची आकृती तयार होत आहे. (हेही वाचा: BAPS Hindu Mandir in Abu Dhabi New Pictures: बीएपीएस हिंदू मंदिराच्या प्रगतीचे साक्षीदार होण्यासाठी अबुधाबीमध्ये आंतरराष्ट्रीय मान्यवर एकत्र आले)
अयोध्या की सड़कों पर लगाई गई डिजिटल रंगोली, भारत में कहीं और नहीं है ऐसी व्यवस्था IIजय श्रीराम🙏 pic.twitter.com/wUAhx0dsMF
— मुकेश (@mukesh888abvp) January 29, 2024
राम नगरी अयोध्या रंग बिरंगी रोशनियों से सजी हुई है। भक्ति पथ पर डिजिटल रंगोली भक्तों को खूब लुभा रही है।#AyodhyaDham #RamMandir #Ayodhya pic.twitter.com/XjIzINQQfC
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) January 31, 2024
#WATCH | Uttar Pradesh: Ayodhya streets adorned with digital rangoli; visuals from Hanumangarhi Temple entry road. pic.twitter.com/0MsmC6cPUX
— ANI (@ANI) February 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)