भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के गुरुवारी (11 गुरुवार) जाणवले. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानात गुरुवारी 5.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर दिल्ली आणि उत्तर भारतातील बहुतेक भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. इस्लामाबाद आणि लाहोरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र पाकिस्तानातील कोरोरच्या दक्षिण-पश्चिम दिशेने 25 किमी अंतरावर होते. भूकंपाची खोली 33 किमी होती. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानलाही भूकंपाचा धक्का बसला.

दिल्ली-एनसीआरला भुकंपाचे धक्के

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)