Hyderabad Police Bust Cybercrime Racket: तेलगंणातील हैद्राबादच्या सायबर क्राईम पोलिसांनी विविध सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी झालेल्या ३६ जणांना अटक करण्यात आले आहे. सर्व आरोपींना गुजरात येथून अटक करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सांगितले की, सायबर क्राईमचा शोध घेण्यासाठी सात पथक नेमण्यात आले होते. ट्रेंडींग फसवणूक, FedEX कुरिअर फसवणूक, KVC फसवणूक यासह २० प्रकरणांची नोंद घेण्यात आली आहे. या आरोपींनी 10 कोटी हून अधिक लोकांची फसवणूक केली. सायबर पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने, लॅपटॉप, बॅंक पासबूक, बॅंक क्रेडिट कार्ड, मोबाईल फोन, सिमकार्ड आदी साहित्य जप्त केले. पोलिसांनी रोख रक्कम देखील जप्त केली आहे. तर तेलंगणात १३१ गुन्हे दाखल आहेत. (हेही वाचा- नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! बेलापूरमधील अपार्टमेंटमध्ये सेक्स रँकेट चालवणाऱ्या महिलेला अटक; देहव्यापारास भाग पाडलेल्या मुलीची सुटका)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)