रोल्स रॉइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून हॉक विमान खरेदीत भारत सरकारची फसवणूक केल्याबद्दल सीबीआयने ब्रिटिश एरोस्पेस कंपनी रोल्स-रॉइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रोल्स-रॉइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक टिम जोन्स यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय सुधीर चौधरी, भानू चौधरी आणि अन्य अनोळखी सरकारी कर्मचारी आणि इतर काही खासगी व्यक्तींविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, अज्ञात सार्वजनिक सेवकांनी त्यांच्या अधिकृत पदांचा गैरवापर केला आणि 734.21 मिलिअन ब्रिटिश पाउंड मध्ये एकूण 24 हॉक 115 एडवांस जेट ट्रेनर (एजेटी) विमाने मंजूरी केली व खरेदी केली. रोल्स रॉयसवर मोठा आरोप असा आहे की कंपनीने भारतातील अनेक सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) शी संबंधित कंत्राटे मिळवण्यासाठी मध्यस्थ लोकांना कोट्यावधी रुपयांची लाच दिली होती. याच प्रकरणात 2019 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने रोल्स रॉयसविरोधात गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा: Gangwar In Tihar Jail: तिहार जेलमध्ये पुन्हा गँगवार, दोन्ही गटातील हाणामारीत कैदी जखमी)
CBI registers a case against British Aerospace company Rolls Royce India Pvt Ltd, Tim Jones, Director Rolls Royce India Pvt Ltd and private individuals Sudhir Chuadhrie and Bhanu Chaudharie and other unknown public servants and private persons with the objective to cheat the… pic.twitter.com/tREN8OUkyk
— ANI (@ANI) May 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)