बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी संध्याकाळी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यापूर्वी नितीश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेवरून हद्दपार विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर म्हटले की, ‘सध्या देश कठीण काळातून जात आहे. हे स्वातंत्र्यानंतरचे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार बदलणे आवश्यक आहे. नितीशकुमार यांनी घेतलेल्या पुढाकारासोबत आम्ही आहोत. आपण सर्वांनी एकत्र येऊन केंद्राच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.’ (हेही वाचा: Bihar CM Nitish Kumar Meet Rahul Gandhi: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)