आज केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत, नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएए (CAA) च्या नियमांची अधिसूचना जारी केली आहे. यासोबतच हा कायदा देशात लागू झाला आहे. यामुळे भारताच्या तीन मुस्लिम-बहुल शेजारील देशांमधील (पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश) गैर-मुस्लिम आणि धार्मिक अत्याचारित लोकांना भारतीय नागरिक बनण्याचा मार्ग मोकळा झाला.  त्यानंतर आता ऑनलाइन भेटलेल्या पुरुषाशी लग्न करण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणारी सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेने, केंद्राने सीएए लागू केल्याची घोषणा केल्यानंतर यूपीच्या नोएडामध्ये तिच्या कुटुंबासह उत्सव साजरा केला. यावेळी तिने रसगुल्ल्याचे वाटपही केले. आपला आनंद व्यक्त करताना ती म्हणाली, ‘आम्ही खूप आनंदी आहोत, आम्ही भारत सरकारचे अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदींनी जे वचन दिले ते पूर्ण केले. सीएएच्या थेट लाभार्थी नसतानाही सीमा हैदरने आपला आनंद साजरा केला आहे. सीमा हैदर ही मुस्लिम असून ती गेल्या वर्षी भारतात आली आहे. (हेही वाचा: CAA Rules PDF Download Online: भारतामध्ये सीएए लागू; जाणून घ्या भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांसाठी काय आहेत नियम)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)