CAA Rules PDF Download Online: केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएए (CAA) च्या नियमांची अधिसूचना जारी केली आहे. यासोबतच हा कायदा देशात लागू झाला आहे. या कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायांना नागरिकत्व दिले जाईल. याबाबत माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले की, 'मोदी सरकारने नागरिकत्व (दुरुस्ती) नियम, 2024 ची अधिसूचना जारी केली आहे. या नियमांमुळे आता पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये धार्मिक आधारावर छळ झालेल्या अल्पसंख्याकांना आपल्या देशात नागरिकत्व मिळू शकेल.'

ते पुढे लिहितात, 'या अधिसूचनेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक वचनपूर्ती केली आहे. संविधान निर्मात्यांनी या देशांमध्ये राहणाऱ्या शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना दिलेले वचन त्यांनी पूर्ण केले आहे.' तर हे सीएए नियम नक्की आहेत तरी काय? 'या' लिंकवर क्लिक करून तुम्ही याबाबतचे नियम जाणून घेऊ शकता तसेच हे सीएए नियम PDF फॉरमॅटमध्ये ऑनलाइन मोफत डाउनलोडही करू शकता. (हेही वाचा: Citizenship Amendment Act: केंद्र सरकारने लागू केला नागरिकत्व सुधारणा कायदा, अधिसूचना जारी; जाणून घ्या CAA म्हणजे नक्की काय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)