Child Raped by Russian National: उत्तर गोव्यातील अरंबोल गावात एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर रशियन नागरिकाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी आता  देश सोडून पळून गेला आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीने आरंबोल येथे एका रात्रभर शिबिराचे आयोजन केले होते, त्यावेळी 4-5 फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी 19 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. इलिया वासुलेव्ह असे या आरोपी रशियन नागरिकाचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) चे कलम 376, गोवा बाल कायदा कलम 8 (बाल अत्याचार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण अधिनियम (POCSO) चे कलम 4 आणि 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलीने घटनेच्या काही दिवसांनंतर तिच्या पालकांना याबाबत माहिती दिली. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस आता रशियन अधिकाऱ्यांची मदत घेणार आहेत. (हेही वाचा: Indore Shocker: पार्टनरच्या सांगण्यावरून तरुणाने केले Sex Change Operation; नंतर प्रियकराचा लग्न करण्यास नकार, गुन्हा दाखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)