छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात, मोबाईल फोन रिचार्जसाठी पैसे न दिल्याने एका मुलाने आपल्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. घटनेनंतर ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. याशिवाय आरोपी मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. हे प्रकरण पाथळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. अहवालानुसार, मयत साईनाथ तिर्की (वय-52 वर्षे) हे त्यांच्या पहिल्या मृत पत्नीपासूनचा मुलगा रणजित तिर्की (वय-30 वर्षे) आणि दुसरी पत्नी सुमती तिर्की यांच्यासोबत राहत होते. काही दिवसांपूर्वी आरोपी रणजितने मोलमजुरी करून काही पैसे कमावले होते आणि मजुरीचे पैसे वडील साईनाथ यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते.
मुलाने मोबाईल रिचार्ज करण्यासाठी वडिलांकडे जमा केलेले पैसे मागितले असता वडिलांनी सध्या पैसे नसल्याचे कारण सांगून, नंतर देऊ असे सांगितले. या साध्या गोष्टीने संतापलेल्या मुलाने वडिलांशी वाद घातला. वाढत्या वादात संतप्त झालेल्या मुलाने वडिलांवर काठीने आणि कुऱ्हाडीने हल्ला केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. नवऱ्याला सोडवण्यासाठी आलेल्या सावत्र आई सुमतीलाही आरोपी मुलगा रणजितने बेदम मारहाण केली. (हेही वाचा: Kerala ATM heist:धडाधड झाडल्या गोळ्या, सिनेस्टाईल पाटलाग; एटीएम लुटणारी टोळी तामिळनाडू पोलिसांकडून जेरबंद, एकाचा जागीच मृत्यू)
मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या-
Jashpur : मोबाइल रिचार्ज के पैसे नहीं देने पर हत्या, पिता की कुल्हाड़ी से हत्या#CGNews #Jashpur #CrimeNews #LatestNews #ZeeMPCG
For More Updates : https://t.co/m85Z2hn5lz pic.twitter.com/ylekgQoq1h
— Zee MP-Chhattisgarh (@ZeeMPCG) September 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)