नेकबँड ब्लुटूथ स्फोट झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथे घडली. भारत समाचार वृतसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आशीष असे या तरुणाचे नाव असून तो 17 वर्षांचा आहे. आशीष हा घराच्या छतावर मोबाईल वापरत होता. त्याच वेळी त्याच्या कानामध्ये नेकबँड ब्लुटूथ सुरु होता. याच वेळी अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज ऐकून त्याचे कुटुंबीय घराच्या छतावर पोहोचले. त्यांनी जखमी आशीष यास रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेतली असून, सदर तरुण कोणत्या कंपनीचा ब्लुटूथ वापरत होता. त्याने सुरक्षेची सर्व परिमानं पूर्ण केली होती का? याबाबत चौकशी केली जात आहे.

17 वर्षीय तरुणाने गमावले प्राण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)