गाझियाबाद महानगरपालिकेच्या (GMC) महापौर सुनीता दयाल यांचा संयम सुटला आणि भाजपच्या नगरसेवकाचे मुंडकं छाटण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंगळवारी दुपारी जीएमसी बोर्डाच्या बैठकीत वाद सुरू असताना ही घटना घडली. भाजपचे नगरसेवक सचिन डागर यांनी दयाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर वादाला तोंड फुटले. दयाल महापालिकेच्या जमिनीवर बांधलेली घरे पाडण्याचे काम करत असताना, या प्रकरणांमध्ये अटक झालेल्यांना ‘लॅन्डमाफिया’च्या मदतीने सोडण्यातही त्या मदत करतात, असा आरोप डागर यांनी केला. उद्यानाच्या जागेवर रस्ता बनवण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा पुरावा असेल तर दाखवा आणि पुराव्याशिवाय असे आरोप करू नका, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे.

पहा व्हीडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)