सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना धक्का बसला आहे. इथले भाजपचे काही नगरसेवक आणि सरपंच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त होते. आता देवगड नगर पालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकरू आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यासोबत कणकवलीच्या माईन आणि कालमठ ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सरपंच धनश्री मेस्त्री आणि प्रज्ञा मिस्त्री यांचाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)