विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असलेल्या वाहतूक पोलिसाच्या हाताला करकचून चावा घेतल्याची घटना पुढे येत आहे. ही घटना बंगळुरु शहरातील एका रस्त्यावर घडली. सदर वाहतूक पोलीस कर्तव्यावर होता आणि दुचाकीस्वाराचे छायाचित्र टीपणे हा त्याच्या कामाचा भाग होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये गुन्हेगार पोलीस हवालदाराचा हात चावताना दिसत आहे.आरोपीने पोलिसाचा मोबाईल हिसकावून त्याच्यावर हल्ला केला. विल्सन गार्डन ट्रॅफिक पोलिस हद्दीत सोमवार, 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. बेंगळुरू पोलिसांनी एस सय्यद शफी या आरोपीला अटक केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)