कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या निकालात सत्तांतर झाल्यानंतर आता कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बेंगळूरू मध्ये विधानसभा परिसरात गोमुत्र शिंपडून आणि पूजा करून शुद्धिकरण केल्याचा दावा केला आहे. कर्नाटकात निवडणूकांची धामधूम सुरू होण्यापूर्वीच कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी, त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यावर विधानसौध डेटॉल आणि गोमूत्राने शुद्ध करणार असल्याचं म्हटलं होतं. भाजपच्या राजवटीत भ्रष्टाचाराने ते दूषित झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.
पहा शुद्धिकरणाचा व्हिडीओ
#WATCH | Bengaluru: Congress workers sprinkle cow urine and perform Pooja at the State Assembly in Bengaluru. They said that they are 'purifying' Vidhana Soudha. pic.twitter.com/SWapoH7vOL
— ANI (@ANI) May 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)