Ayodhya Ram Mandir: जर तुम्ही अयोध्या येथील राम लल्लाचे दर्शन करण्यास जाणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. श्री रामजन्मभूमी मंदिरातील फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करणे आता थांबणार आहे. म्हणजेच मंदिर परिसरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री रामजन्मभूमीत राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून लोक मंदिर परिसरात मोबाईल घेऊन जात आहेत. मात्र ट्रस्ट आणि प्रशासन यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत, शनिवारपासून मंदिर परिसरात मोबाईल घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सामान्य जनता असो की व्हिआयपी असो, कोणीही राम मंदिरात मोबाईल घेऊन जाऊ शकणार नाही. मंदिराचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी भाविकांना या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा: Char Dham Yatra 2024 Death Toll: उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत 50 हून अधिक भाविकांचा मृत्यू; केदारनाथमध्ये सर्वाधिक 27 लोकांनी गमावला आपला जीव)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)