Assassination Attempt: आंध्र प्रदेशच्या नांदयाल जिल्ह्यातील अल्लागड्डा येथे तेलुगू देसम पक्षाच्या उमेदवार भूमा अखिला प्रिया यांच्या अंगरक्षकावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. निखील असे पिडीत व्यक्तीचे नाव असून, हल्लेखोरांनी निखीलला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजवरून ही संपूर्ण घटना समोर आली आहे. मात्र या घटनेमागे कोणाचा हात आहे हे कळू शकलेले नाही. भूमा अखिला प्रिया यांच्या निवासस्थानाबाहेर निखीलवर मंगळवारी रात्री उशिरा कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला. या घटनेमध्ये निखिल गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर हल्लेखोर ताबडतोब पळून गेले. सध्या निखीलवर नांदयाल शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निखिलवर यापूर्वी नांदयाल येथे आयोजित नारा लोकेश पदयात्रेदरम्यान, टीडीपीचे नेते एव्ही सुब्बारेड्डी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. या घटनेनंतर पोलिसांनी अल्लागड्डा येथील भूमा अखिल प्रिया आणि एव्ही सुब्बारेड्डी यांच्या निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. (हेही वाचा: Agra: समलिंगी जोडीदाराला चापट मारल्याने 23 वर्षीय मुलाने केली वडिलांची हत्या)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)