महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशीचा सण साजारा केला जात आहे. वारकरी मंडळी, विठ्ठल-रूक्मिणी मातेचे भक्त आज मंदिरामध्ये दर्शन घेऊन दिवसभराचा उपवास करून एकादशीचे व्रत पाळत आहेत. अशामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील X वर पोस्ट करत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी मराठी मध्ये पोस्ट केली आहे. 'आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे'अशी भावना त्यांनी पोस्ट मध्ये मांडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची…
— Narendra Modi (@narendramodi) July 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)