दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातून जनतेला संदेश दिला आहे.

भारताला कमकुवत करणाऱ्या शक्तींविरुद्ध दक्ष राहण्याचे आवाहन करत म्हटले आहे की, "आपण सावध राहिले पाहिजे, या शक्तींना ओळखले पाहिजे आणि त्यांना पराभूत केले पाहिजे. केजरीवाल तुरुंगाच्या मागे आहेत असा विचार दिल्लीतील महिला करत असतील. त्यांना 1000 रुपये मिळतील का कोणास ठाऊक? मी आवाहन करतो. त्यांनी त्यांच्या भावावर, त्यांच्या मुलावर विश्वास ठेवावा. त्याला जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही. मी लवकरच बाहेर येईन आणि माझे वचन पाळीन." असा संदेश त्यांनी दिला आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनी तो वाचून दाखवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)