'वारीस पंजाब दे'चा (Waris Punjab De) प्रमुख आणि सध्या फरार असलेल्या अमृतपाल सिंगच्या (Amritpal Singh) पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. किरणदीप कौर (Kirandeep Kaur) यांना लंडनला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अमृतसर विमानतळावर (Amritsar Airport) ताब्यात घेण्यात आले. किरणदीपची आता सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. मार्चमध्ये, अमृतपाल सिंगच्या कारवायांसाठी कथित परदेशी निधी प्रकरणी तिची जल्लूपूर खेडा गावात चौकशी करण्यात आली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)