स्टार्टअप कंपनी टेबल स्पेसचे संस्थापक, अध्यक्ष आणि सीईओ अमित बॅनर्जी यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. कंपनीने अधिकृत निवेदनाद्वारे त्यांच्या अकाली मृत्यूची पुष्टी केली. अमित बॅनर्जी हे 44 वर्षांचे होते. तंत्रज्ञान आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील विपुल अनुभव असलेले व्यावसायिक, अशी त्यांची ओळख होती. याआधी 2017 मध्ये टेबल स्पेसची स्थापना करण्यापूर्वी, त्यांनी 13 वर्षांहून अधिक काळ Accenture येथे काम केले. नाविन्यपूर्ण वर्कस्पेस सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी करण चोप्रा सोबत टेबल स्पेसची सह-स्थापना केली. टेबल स्पेस हे को-वर्किंग स्पेसेस ऑफर करते. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद यांसारख्या सात शहरांमध्ये या स्टार्टअपच्या शेअर्ड ऑफिस स्पेस उपलब्ध आहेत. बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली, टेबल स्पेसची झपाट्याने वाढ झाली. बॅनर्जींनी कंपनीचे व्यवसाय नियोजन, मालमत्ता व्यवस्थापन अशा अनेक बाबींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. (हेही वाचा: Rustom Soonawala Dies: पद्मश्री पुरस्कार विजेत्या स्त्रीरोगतज्ज्ञ रुस्तम सूनावाला यांचे निधन, 95 व्यावर्षी दीर्घ आजाराने घेतला अखेरचा श्वास)

अमित बॅनर्जी यांचे निधन-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)