राजस्थान च्या अजमेरमधील सर्वात मोठ्या सेक्स स्कॅन्डल आण ब्लॅकमेल प्रकरणात, नफीस चिश्ती आणि नसीम उर्फ टारझनसह सहा आरोपींना विशेष पॉक्सो कायदा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. नफीस चिश्ती, नसीम उर्फ टारझन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहेल गनी, सय्यद जमीन हुसेन आज कोर्टामध्ये हजर होते. 1992 पासून च्या या प्रकरणामध्ये 100 हून अधिक मुलींना अश्लील फोटो टाकून ब्लॅकमेल करण्यात आले होते. या मुलींवर गॅंग़रेप देखील करण्यात आले होते. नक्की वाचा: Badlapur School Case: अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी बदलापूर बंदची हाक; रस्त्यावर पालक आणि नागरिकांचा ठिय्या.
पहा पोस्ट
Rajasthan: In Ajmer's largest blackmail case, six accused, including Nafees Chishti and Naseem alias Tarzan, were found guilty by the Special POCSO Act Court. They blackmailed over 100 girls with obscene photos from 1992 pic.twitter.com/pqwkoPo1fk
— IANS (@ians_india) August 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)