अदानी एंटरप्रायझेसचा फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) शुक्रवार, 27 जानेवारी रोजी उघडला. यामध्ये युएई (UAE) ची दिग्गज सूचीबद्ध कंपनी इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने (IHC) देखील पैसे गुंतवले आहेत. आयएचसीने जाहीर केले की त्यांनी अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओमध्ये त्यांची उपकंपनी ग्रीन ट्रान्समिशन इन्व्हेस्टमेंट होल्डिंग आरएससी लिमिटेड मार्फत गुंतवणूक केली आहे. आयएचसीने यामध्ये $400 दशलक्षची (3261.29 कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. आयएचसी ही अबु धाबी येथे स्थित कंपनी आहे आणि ती तेथे सर्वाधिक मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांपैकी एक आहे.
International Holding Company, thediversified Abu Dhabi-based conglomerate, announces to invest AED 1.4 billion (USD 400 million) into Adani Enterprises Further Public Offering (FPO) & a part of Adani Group, through its subsidiary Green Transmission Investment Holding RSC Limited pic.twitter.com/iWjDufSdkz
— ANI (@ANI) January 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)