New FDI Limits For Satellites: निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील वित्त मंत्रालयाने, विदेशी चलन व्यवस्थापन नियमांतर्गत उपग्रहाशी संबंधित क्रियाकलापांसाठी थेट विदेशी गुंतवणुकीच्या नवीन मर्यादा अधिसूचित केल्या आहेत. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना उपग्रह क्षेत्रातील गुंतवणूक योजना वाढवता येतील. अंतराळ क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीचे उदारीकरण करण्याच्या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकत्याच दिलेल्या मंजुरीनंतर हा विकास झाला आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, परदेशी गुंतवणूकदार आता या क्षेत्रात 100 टक्के एफडीआय गुंतवू शकतात. विशेष म्हणजे, ही अधिसूचना टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या भारत भेटीच्या काही दिवस अगोदर आली आहे. येत्या 21 ते 22 एप्रिल दरम्यान मस्क आपल्या भेटीदरम्यान विविध भारतीय अंतराळ कंपन्यांशी भेट घेणार असल्याची माहिती आहे. (हेही वाचा: Starlink Receives Government Approval: लवकरच भारतामध्ये उपलब्ध होऊ शकते Elon Musk यांच्या स्टारलिंकची इंटरनेट सेवा; मंत्रालयाकडून मिळाली तत्वतः मान्यता)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)