दिल्लीच्या महापौरपदाच्या (Delhi Mayor) निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) शैली ओबेरॉय (shelly oberoi) यांनी बाजी मारली. 266 मतांपैकी 150 मते हे शैली ओबेरॉय यांना मिळाली तर भाजपचे उमेदवार गुप्ता यांना 116 मते मिळाली. या निवडणुकीत एकूण 10 नामनिर्देशीत खासदार, 14 नामनिर्देशित आमदार आणि 250 पैकी 241 नगरसेवकांनी मतदान केले. काँग्रेसच्या 9 नगरसेवकांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या विजयानंतर गुंडे हार गये, जनतता जीत गयी असे ट्विट आपचे नेते मनिष सिसोदिया (Manish Sisodiya) यांनी केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)