Netherlands PM Mark Rutte Used UPI: नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुटे यांनी बेंगळुरूमधील एका कॅफेला भेट दिली. जिथे त्यांनी पैसे देण्यासाठी UPI चा वापर केला. त्यांनी त्यांचा हा अनुभव माध्यमांशी बोलताना शेअर केला. पंतप्रधान मार्क रुटे यांनी सोमवारी बेंगळुरू येथे आगमन केले. त्यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची भेट घेतली. G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारी भारतात आलेले मार्क रुट्टे कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांसोबत अनौपचारिक बैठकही घेत आहेत. रविवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील G20 शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचे नेदरलँड्सचे समकक्ष मार्क रुटे यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेतही त्यांनी भाग घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)