Narayana Murthy & Akshata Murty: ब्रिटनची फर्स्ट लेडी अक्षता मूर्ती आणि तिचे वडील आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये दोघेही कर्नाटकातील बेंगळुरूमधील लोकप्रिय आईस्क्रीम जॉइंटमध्ये वेळ घालवताना दिसून आले आहेत. अक्षताच्या फोटो X वर अनेक वापरकर्त्यांनी शेअर केलाआहे. बेंगळुरूच्या जयनगर येथील आयकॉनिक कॉर्नर हाऊसमध्ये अक्षता मूर्ती आणि नारायण मूर्ती आइस्क्रीमचा आस्वाद घेताना या छायाचित्रात कैद झाले आहे.  " दुकानात अनेक जण होते. दोघेही शांतपणे आले आणि त्यांनी आईस्क्रीम विकत घेतले..... सुदैवाने कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखले आणि त्यांना खुर्च्या दिल्या'," असे एकाने X वर लिहिले.

पाहा फोटो:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)