Assam Fire: आसाममधील नागाव येथे भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. आसामधील नागाव जिल्ह्यातील काठमिल चारियालीजवळ भीषण आग लागली. रविवारी रात्री ही घटना घडली असून या भीषण आगीत लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे. या आगीत किमान पाच घरांचे नुकसान झाले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीची नेमके कारण अद्याप समोर आले नाही. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घरांना आग लागली त्या घरांच्या वरच्या भागातून धुराचे दाट लोट दिसल्याने रस्त्यावर मोठी घबराट पसरली आहे.
#WATCH | Nagaon, Assam: At least five houses were damaged in the fire that broke out near Kathmill Chariali on Sunday night. No casualties were reported. Firefighters, with the help of the police and locals, were able to control the fire: Police pic.twitter.com/xkwiREd7uP
— ANI (@ANI) March 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)