Accident Video: कर्नाटकातील मंगळुरू येथील मन्नागुड्डा जंक्शनजवळ आज भरधाव कारने फूटपाथवर जाऊन पादचाऱ्यांना  जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात रुपश्री असं नाव असलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती घेत कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कमलेश बलदेव असं कार चालकांचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)