Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे भरदिवसा बसस्थानकावरून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका विद्यार्थींनीचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गर्दीने गजबजलेल्या झाशी रोड बसस्थानकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झाले आहे. भिंड येथील पीडित विद्यार्थिनी नुकतीच बसमधून उतरली होती तेव्हा एका आरोपीनं तिला बळजबरीने बाईकवर चढवले. अपहरणाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)