Haryana Shooting Video: हरियाणा राज्यातील भिवानी परिसरात दिवसाढवळ्या एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. दुचाकीवरून चार हल्लेखोर येतात आणि घराबाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीवर गोळीबार करतात. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पीडित व्यक्ती घराकडे धाव घेतो. दरम्यान एक महिला धाडस दाखवून हल्लेखोरांचा सामना करण्यासाठी झाडून घेऊन बाहेर येते आणि हल्लेखोरांवर हल्ला करते, महिलेच्या धाडसी कृत्याला पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार होतात. ही घटना जवळ असलेल्या सीसीटीव्हीत कैद होते. ही घटना अलीकडेच झाल्याचे सोशल मीडियावरून दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. धाडसी महिलेचा सोशल मीडियावर भरपूर कौतुक होत आहे. गोळीबार घटनेत त्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)