सोमवारी रात्री पेट्रोल आणि डिझेल टंचाईची अफवा पसरल्याने उत्तराखंडमधील पेट्रोल पंपावर मोटार-बाईक आणि कारच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विविध शहरांतील पेट्रोल पंपांवर, प्रामुख्याने हरिद्वार आणि रुरकी येथे 13 जून रोजी रात्री उशिरा प्रचंड गर्दी दिसली. स्थानिक पंपावरील अनेक कामगारांनी पंप सोडून पळ काढला. सीएमओकडून विभाग अधिकाऱ्यांना परिस्थिती स्पष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेहराडूनचे डीएम आर राजेश कुमार यांनी अफवा पसरवणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Uttarakhand| Due to rumours about petrol &diesel shortage, long queues of vehicles formed to refuel vehicles late last night. Instructions given to dept officers from CMO to clarify situation. Orders given to identify&take action against rumour-mongers: Dehradun DM R Rajesh Kumar pic.twitter.com/eCgXSrHBhZ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)