Lioness Death in Gujarat: गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात सिंहिणीला चिरडल्याच्या (Lioness Death) आरोपाखाली एका ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका वन अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. 24 एप्रिल रोजी जिल्ह्यातील देवलिया गावाजवळ अमरेली-सावरकुंडला महामार्गावर एक अपघात झाला. त्यात असे एका भरधाव ट्रक सिंहिणीला जोरदार धडक दिली. ज्यात सिंहणी चिरडली गेली. त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत राजेश पदारिया असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आणि गुप्तचर माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, पथकांनी आजूबाजूचा परिसर तपासला आणि पेट्रोल पंप आणि घटनास्थळाभोवती असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्यात आली. त्यांनी सांगितले की, आरोपीवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा 2022 च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा जामीन फेटाळल्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
STORY | Truck mows down lioness in Gujarat's Amreli; driver held
READ: https://t.co/Sp3lDOvrUy pic.twitter.com/ttNE7iTAxf
— Press Trust of India (@PTI_News) April 27, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)