Kerala Kidnapped Girl Rescued Video: केरळमध्ये खंडणीसाठी एका सहा वर्षाच्या मुलीच अपहरण झालं होते. या घटनेनंतर शहारत एकच खळबळ उडाली. तिरुअंनतपुरम येथे 75 किमी अंतरावर असलेल्या कोल्लम शहराच्य मध्यभागी असलेल्या एका शेतात मंगळवारी मुलगी बेशुध्द अवस्थेत सापडली. अबीगेल सारा रेगी असं मुलीचं नाव होतं तिच्या घरापासून सुमारे  150 मीटर  अंतरावर कारमधून नेले. 10 लाख रुपयांच्या खंडणीसाठी मुलीचं अपहरण झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देताच मुलीच्या शोधासाठी पथक नेमले. पोलिसांनी  24 तासांच्या आत मुलीला शोधून काढले आहे. त्यामुळे परिसरात आनंदी वातावरण झाले आहे. अपहरण करणाऱ्यांपैकी एक महिला आणि तीन पुरुष असल्याची माहिती समोर येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)