Jamui Communal Violence: दोन गटात झालेल्या हाणामारीत जिल्हा प्रशासनाने काही काळासाठी संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. काही लोक हनुमान चालीसा पठण (Religious Procession) करून घरी परतत होते. त्या दरम्यान, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी जमुईच्या बलियाडीह भागात दोन समुदायांमध्ये दगडफेक आणि हाणामारी झाली. यामध्ये जमुई नगर परिषदेचे उपमुख्य नगरसेवकांसह अनेक जण जखमी झाले.

यावेळी अनेक वाहनांचेही नुकसान झाले. या घटनेनंतर जमुईच्या एसडीएमसह अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यासोबतच परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दगडफेक करणाऱ्यांपैकी 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यासोबतच जिल्ह्याची इंटरनेट सेवाही (Internet Service) काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.

बिहारमध्ये धार्मिक वादावरून दोन गटात हाणामारी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)