ओडिशाचे राज्य प्रशासन 23 ऑक्टोबर रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर निर्माण होणाऱ्या संभाव्य एका सार्वजनिक निवेदनात, सिंग यांनी रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उद्या म्हणजेच 23 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळ प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे. भारताच्या हवामान खात्याने (IMD) बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याच्या अंदाजानुसार केली आयएमडीने ही शक्यता व्यक्त केली आहे. खास करुन ओडिशा आणि पश्चीम बंगाल ही राज्ये वादळाने अधिक प्रभावीत होतील, असे आयएमडीने म्हटले आहे. याव्यतिरिक्त, तामिळनाडूच्या प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) असा अंदाज वर्तवला आहे की पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र 23 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात तीव्र होईल आणि दक्षिणेकडील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. (हेही वाचा, Cyclone Dana Alert: ओडिशा राज्यात मुसळधार पाऊस; भूस्खलनाची शक्यता, 13 जिल्ह्यांमध्ये शाळा बंद)
दाना चक्रीवादळाची सध्यास्थिती घ्या जाणून
Windy: Wind map & weather forecast
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)