ALH Dhruv Helicopter Crash: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडजवळ लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेट पायलट जखमी झाले असले तरी ते सुरक्षित आहेत. लष्करी अधिकाऱ्याने यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तीन अधिकारी होते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, आर्मीचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर किश्तावरजवळ कोसळले आणि हेलिकॉप्टरमधील पायलट जखमी झाले असले तरी ते सुरक्षित आहेत. या वृत्तात लष्कराच्या अधिकार्‍यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, घटनेच्या अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. (हेही वाचा - Vehicle Sales In April Decline: एप्रिल महिन्यात वाहन विक्री चार टक्क्यांनी घटली, दुचाकींचा ग्राहकांसाठी संघर्ष सुरुच, FADA द्वारा आकडेवारी जाहीर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)