Hydrabad Accident: हैद्राबाद येथे एक भरधाव कारने एका तरुणाला धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत तरुण नोव्होटेल हॉटेलमध्ये बाऊन्सर म्हणून काम करायचा. तारक राम असं त्याची ओळख पटली आहे. शहरातील जुबली हिल्स परिसरात हा भीषण अपघात झाला. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातात तरुणाला डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या धडकेत पीडित २० फुट लांब हवेत फेकला गेला आहे.
#HitAndRun case in #Hyderabad , recorded in #CCTV :
A bouncer by name Tarak Ram (30), died and another severely injured after a #speedy car hit their bike near Peddamma Temple in Jubilee Hills, in wee hours today and escaped from the spot.#RoadSafety #RoadAccident pic.twitter.com/yw8Gd8x4rt
— Surya Reddy (@jsuryareddy) January 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)