Hyderabad Accident: हैद्राबादमध्ये दोन कारच्या धडकेत (car collision)भीषण अपघात झाला आहे. सिकंदराबाद (Secunderabad)येथील ज्युबली बस स्थानक(Jubilee Bus Station)जवळ सिग्नल जंप करताना दोन्ही कार एकमेकांना धडकल्या. त्यातील एक कार आधी दुभाजकावर आदळली नंतर रस्त्यावर तीन वेळा उलटून रस्त्याच्या मधोमध पलटली. यात दोन्ही कारचे नुकसान झाले. अपघातामुळे रस्ता ब्लॉक झाला होता. अपघातानंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी कारकडे धाव घेतली आणि आतमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा:Pune Accident: पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण ताज असतानाच, अज्ञात कारची आणखी एकाला धडक (Watch Video) )

पोस्ट पाहा:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)