Haryana: हरियाणातील बहादूरगडमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुण जोडप्याने शनिवारी आपल्या अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी पोलिसांनी दिली आहे. दोघेही YouTubers होते आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले. गरवित (25) आणि नंदिनी (22) अशी पोलिसांनी मृतांची नावे सांगितली आहे.

ते बहादूरगड येथे भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला असून, तेथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. एक लघुपट बनवून दोघेही डेहराडूनहून आपल्या टीमसोबत परतले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)