गुजरातमधील जामनगरमधील गोवना गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या एका मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. जामनगर जिल्ह्यातील लालपूर तालुक्यातील गोवना गावात मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता एक दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. बोअरवेलमध्ये बालक पडल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ अग्निशमन दल पाठवले आणि राजकोटहून एसडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. यानंतर मुलाला वाचवण्याचे प्रयत्न सुरूच होते. गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील लालपूर तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी कटान चावडांनी याबद्दलची माहिती दिली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)