Eid al-Fitr Celebration: देशभरात आज रमजान ईद (Eid al-Fitr) उत्साहात साजरी केली जात आहे. सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना गळाभेट करत शुभेच्छा देत आहेत. दिल्लीच्या जामा मशिदपासून मुंबईच्या माहिम येथील मशिदी मध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी नमाजअदा केली. त्यातच आता हैदराबादमध्ये एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी ईद-उल-फित्र निमित्त लोकांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्याच्या व्हिडीओ समोर आला आहे. लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव तेथे उपस्थित होते. प्रत्येकाला हात मिळवत ओवैसी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. ईजनिमित्त भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) देखील बंद राहिला आहे. आज बंद राहिल्यानंतर उद्या म्हणजेच शुक्रवारी (12 एप्रिल) बाजार नेहमीप्रमाणे सुरु राहील.(हेही वाचा :Eid Mubarak 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून Eid-ul-Fitr च्या शुभेच्छा ) 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)