सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होत आहेत. या तारखेपर्यंत बिहार बोर्डाची इंटर परीक्षा संपेल. इतर सर्व बोर्ड परीक्षा 2025 मध्ये 13 फेब्रुवारी किंवा त्यानंतर सुरू होत आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'परीक्षा पे चर्चा 2025' कार्यक्रम (Pariksha Pe Charcha 2025) या बोर्ड परीक्षांचा आधी आयोजित केला जात आहे. परीक्षा पे चर्चा 2025 सोमवार, 10 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केले जाईल असे सांगण्यात आले आहे. यावेळी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाची शैली थोडी वेगळी आहे. देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच भेटण्याची संधी मिळणार नाही, तर दीपिका पदुकोण सारख्या चित्रपट व्यक्तिमत्त्वाचे आणि सद्गुरु सारख्या आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन देखील मिळेल.
यंदा परीक्षा पे चर्चा 2025 मध्ये, मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये नरेंद्र मोदी, सद्गुरु जग्गी वासुदेव, दीपिका पदुकोण, मेरी कोम, सोनल सबरवाल, विक्रांत मेसी, भूमी पेडणेकर, टेक्निकल गुरुजी, राधिका गुप्ता, ऋजुता दिवेकर, अवनी लेखरा, फूड फार्मर यांचा समावेश आहे. दीपिका पदुकोण मानसिक आरोग्यावर बोलेले, मेरी कोम आणि अवनी लेखरा जीवनातील आव्हानांना तोंड देण्याचे त्यांचे अनुभव शेअर करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देतील. आध्यात्मिक गुरू सद्गुरु ताण व्यवस्थापन आणि सजगता यावर विशेष टिप्स देतील. (हेही वाचा: Maharashtra Board Exams 2025: महाराष्ट्र बोर्ड परीक्षा मध्ये यंदा ज्या केंद्रावर गैरप्रकार आढळतील त्यांच्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द)
Pariksha Pe Charcha 2025-
This year, Pariksha Pe Charcha is getting a next-level upgrade!
It’s not just PM @narendramodi—a power squad is joining in with wisdom, motivation, and some serious life hacks!
🎤 @SadhguruJV's wisdom
🎬 @deepikapadukone's confidence boost
🥊 @MangteC’s winning mindset
…and… pic.twitter.com/fwZSRDJuXi
— MyGovIndia (@mygovindia) February 6, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)