Earthquake In Delhi: देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता दिल्ली एनसीआर भागातील लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक भीतीने घराबाहेर पडले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानचा हिंदुकुश पर्वत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे दिल्ली-एनसीआर तसेच जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय पीर पंजाल प्रदेशाच्या दक्षिण भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. (हेही वाचा - Earthquake in Japan: जपान पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं ; 6 रिश्टल स्केलचा भूकंप)
पहा व्हिडिओ -
Earthquake!#kashmir #Delhi #Earthquakes pic.twitter.com/kshb7HnlRs
— Nishwan Rasool (@NishwanBhatt) January 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)